देशी दारूचा मोठा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

कोल्हापूर: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळील शहापूर परिसरातून देशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

या कारवाईत १ लाख १० हजार किंमती देशी दारूचे ७८ बॉक्स जप्त जप्त करण्यात आले असून बेकायदेशीर देशी दारूचा साठा केल्या बद्दल रवी मिणेकर याला अटक देखील करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक काळात बेकायदा मद्याचा साठा केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)