लॅपटॉप बिघडलाय?

महेश कोळी
बजेट लॅपटॉपचा वेग कालांतराने मंदावत जातो. परिणामी काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे लॅपटॉपचा वेग पूर्वीप्रमाणे करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी इथे काही टिप्स सांगता येतील.
 
विंडोज अपडेट इन्स्टॉल करा : मायक्रोसॉफ्ट नियमितरूपाने विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमसाठी अपडेट रिलीज करत असते. डाऊनलोडिंगमुळे बहुतांशी यूजर याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही मोठी चूक ठरू शकते. कारण अशा प्रकारचे अपडेटस्‌ आपल्या लॅपटॉपसाठी सिक्‍युरिटी आणि परफॉर्मन्स पॅचेसच्या रूपात काम करत असतात. अर्थात अपडेटस्‌ तातडीने घेण्याची घाई करू नये. कारण अपडेट स्थिर आहेत की नाही आणि त्यात कोणती अडचण तर नाही ना? याची खात्री झाल्यावरच ऑपरेटिंग सिस्टिमला अपडेट करण्याचा विचार करावा. विंडोज अपडेटच्या मदतीने आपण लॅपटॉपला संपूर्णपणे सुरक्षित करू शकतो.
स्टोअरेज व्यवस्थापन : आपला लॅपटॉप किंवा संगणक संथ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या इंटरनल स्टोरेज ड्राईव्हवर असलेला अनावश्‍यक डेटा आपण फ्री थळपऊळी WinDir Stat (https://windir stat.net) or Disk savvy (www.disksvvy.com) पासून स्टोरेज ड्राईव्हचे विश्‍लेषण करू शकतो आणि आपल्या स्टोरेजचा उपयोग कशाप्रकारे केला जात आहे, याची माहिती मिळवू शकतो. आपण मॅन्युअली अनावश्‍यक डेटा आणि ऍप्स काढून टाकू शकता. Glary Utilites (www.glarysoft.com) पासून डुप्लिकेटस्‌ शोधून त्याला संगणकातून काढून टाकू शकता आणि जुन्या डेटाचे बॅकअप घेऊ शकता.
हार्डवेअर अपग्रेड करा : आपल्या लॅपटॉपच्या
परफॉर्मन्समध्ये सुधारणा करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हार्डवेअर अपग्रेड करणे होय. आजकाल बहुतांशी लॅपटॉप स्वत: किंवा सर्व्हिस सेंटरच्या मदतीने रॅम आणि हार्डड्राईव्ह अपग्रेड करण्याची सुविधा देते. मल्टीटास्किंगसाठी आपण रॅम दुप्पट करू शकतो. यातून आपल्याला बेसिक सुधारणा दिसू लागतील. जर आपण परफॉर्मन्समध्ये बदल घडवून आणू पाहात असाल तर आपण लॅपटॉपसाठी एक इंटरनल एसएसडीमध्ये गुंतवणूक करू शकता आणि स्टॅंडर्ड एचडीडीपासून मुक्ती मिळवू शकता. एसएसडीच्या वेगाने वाचण्याची आणि लिहिण्याच्या गतीमुळे एकूणात दर्जामध्ये सुधारणा होईल. यातून बूट टाइम आणि प्रोग्रॅम लॉंचमध्ये स्पीड दिसू लागेल. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एसएसडीची किंमत.
सिक्‍युरिटी स्यूटमध्ये गूंतवणूक करा : फ्री अँटिव्हायरस आणि अँटिमालवेअर सॉफ्टवेअरचा वापर करणे चुकीचे नाही. परंतु त्यात सिक्‍युरिटीचे फिचर उपलब्ध असेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. अनेक कंपन्या सॉफ्टवेअरच्या सशुल्क व्हर्जनमध्ये ऍडव्हान्स्ड फिचर्स उपलब्ध करून देतात. अशा स्थितीत आपण सशुल्क सॉफ्टवेअरचा उपयोग करायला हवा. गरज पडली तर आपण दीडशे ते पाचशे रुपयांपर्यंत फुल सिक्‍युरिटी स्यूट कामात आणू शकता.
गरज पडल्यास रिसेट करा : हा सर्वात शेवटचा उपाय होय. सिस्टिम रिसेट केल्याने लॅपटॉपमधील सर्व डेटा आणि ऍप्स डिलिट होतात आणि आपला लॅपटॉप हा फॅक्‍ट्री डिफॉल्ट स्टेजवर येतो. याचाच अर्थ असा की, आपला लॅपटॉप हा ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या मूळ अवस्थेत येते. या टप्प्यात सेटिंग्ज, प्रोग्रॅम्समध्ये असलेली प्रत्येक प्रकारची समस्या दूर होऊ शकते आणि व्हायरस, मालवेअरच्या अडचणी दूर होऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे कंपनीनुसार, ब्रॅंडनुसार लॅपटॉप रिसेटची प्रक्रिया वेगवेगळी असते. आपण फॉरमॅट प्रोसेस सुरू केल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही तास लागू शकतात. आपला इनबॉक्‍स सुस्थितीत
आहे का?

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)