लाचखोर भूमिअभिलेख कर्मचारी गजाआड

कोपरगाव – जागेच्या नवीन खरेदीवर नावाची नोंद लावण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना भुमिअभिलेख उपाधिक्षक कार्यालयातील निमतानदार भुजंग साहेबराव सूर्यवंशी याला रंगेहाथ पकडले. सोमवारी सायंकाळी 5 च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.

नवीन खरेदीवर नावाची नोंद करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार पदावर काम करणारे भुजंग सूर्यवंशी (वय 44 राहणार बळेगाव तालुका वैजापुर जिल्हा औरंगाबाद हल्ली राहणार संभाजीनगर श्रीरामपूर) याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयाची मागणी केली असता तडजोडीअंती दोन हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.

-Ads-

नगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक शाम पवरे, सहाय्यक अधिकारी दीपक कारंडे, हवालदार तन्वीर शेख, पोलीस नाईक आर.पी चौधरी, विजय गंगुल, हवालदार जोशी, चालक रक्ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सायंकाळी पाचच्या सुमारास कार्यालयात जावून ही धडक कारवाई करण्यात आली.

कोपरगाव शहरामध्ये या आठवड्यातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाची ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी भुमिअभिलेख कार्यालयामध्ये अनेक वेळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अनेक जण अडकले होते. या कारवाईने कोपरगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईत सूर्यवंशी याच्यावर रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)