वीस गुंठ्यापर्यंतच्या खरेदीसाठी परवानगी द्या

पंचायत राज समितीकडे सरोदे यांची मागणी

नेवासेफाटा – शेतामध्ये राहण्यासाठी वीस गुंठ्यापर्यंतच्या जमीन खरेदीसाठी परवानगी द्या, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे यांनी नेवासे येथे तपासणीसाठी आलेल्या पंचायत राज समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागामध्ये लोकसंख्येचे व कुटूंबातील संख्येचे प्रमाण वाढत आहे. गावठाण अंतर्गत जागा शिल्लक नाही. शेतीमध्ये जागा देण्यास शेतकरी तयार आहे, मात्र शासनाच्या महसूली धोरणानूसार तुकडेजोड तुकडे बंदी कायद्यामुळे वीस गुंठ्यांपर्यंत खरेदीखताचा व्यवहार होत नाही.

-Ads-

एकीकडे शासन पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या नावाखाली घरकुलबांधणीच्या जागा खरेदीसाठी 50 हजार रुपये अनुदान देते. मात्र, तुकडेबंदी कायद्यामुळे सदरच्या योजनेचा लाभ घरकूल लाभार्थींना घेता येत नाही. ग्रामीण लाभार्थींना घरकुले मंजूर असूनही, जागेअभावी ते वंचित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

याबाबत समितीचे अध्यक्ष आमदार भरत गोगावले म्हणाले, सदरची मागणी योग्य आहे. मंत्रालयात गेल्यानंतर तातडीने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी सरोदे यांना दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)