सेवा क्षेत्रांची माहिती एका क्‍लिकवर

अक्षांश, रेखांशही कळणार : महापालिकेचा पुढाकार

पुणे – वेगवेगळ्या बांधकाम परवानगीपोटी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या अॅॅमेनिटी स्पेसची (सेवा क्षेत्र) माहिती आता एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. या जागांच्या छायाचित्रांसह, त्याचे अक्षांश आणि रेखांश तसेच गुगल मॅपवर ही जागा नेमकी कुठे आहे, याची माहिती महापालिका प्रशासनाने संकलित केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पालिकेच्या एन्टरप्रायजेस जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) प्रणालीवर ती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे या जागांवर होणाऱ्या अतिक्रमणांसह त्याची नेमकी माहिती प्रशासनास उपलब्ध होणार आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने या सेवा क्षेत्राचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्यानुसार, हा अहवाल सादर करण्यात आला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

महापालिकेकडून बांधकाम परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रकल्पांच्या परिसरात पालिकेस सेवा क्षेत्र दिले जाते. ही जागा विकसकांकडून महापालिकेस सीमाभिंत बांधून हस्तांतरित केली जाते. त्यानंतर नगरसेवकांची मागणी आणि त्या भागात असलेल्या प्राथमिक सुविधा लक्षात घेऊन उद्याने, समाज मंदिर, स्वच्छतागृह, शाळा अशा सोयी महापालिकेकडून दिल्या जातात. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 500 सेवा क्षेत्र असल्याची प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यात जवळपास 40 टक्के जागांवर पालिकेने सुविधा दिल्या असून उर्वरित 60 टक्के जागा पडून असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या सेवा क्षेत्रांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांना एका क्‍लिकवर मिळण्यासाठी या जागांचे फोटो काढण्यात आले असून त्यांची अक्षांश आणि रेखांशानुसार, मोजणी करण्यात आली आहे. या शिवाय, गुगल मॅपवरही संबधित ठिकाण दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही ही माहिती आता सहजपणे उलब्ध होणार आहे.

“लॅन्ड लॉक’ जागांबाबतही लवकरच तोडगा
महापालिकेच्या ताब्यात बांधकाम व्यावसायिक अथवा काही विकसांकडून ताब्यात देण्यात आलेल्या जागा “लॅन्ड लॉक’ झालेल्या आहेत. या सेवा क्षेत्रांच्या जागांवर जाण्यासाठी कोणत्याही बाजूस रस्ता नाही. तसेच चारही बाजूंना बांधकामे झालेली आहेत, त्यामुळे या मोक्‍याच्या जागा पडून आहेत. ही बाब लक्षात घेऊन या जागांना रस्ते कशा प्रकारे उपलब्ध होतील आणि त्या जागांचा वापर कसा करता येईल, हे निश्‍चित करण्यासाठी या जागांचीही तपासणी केली जाणार असून रस्त्यासाठी तोडगा काढण्यात येणार आहे, असे मालमत्ता व्यवस्थापन विभाग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)