लालूंच्या घरात उभी फूट! तेज प्रसाद यादवांचा ट्विटद्वारे राजकीय भूकंप

लालू प्रसाद यादव व त्यांच्या राष्ट्रीय जनता दलास लागलेली घरघर काहीकेल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये आपणास दुय्यम स्थान मिळत असल्याने लालू प्रसाद यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे नाराज असल्याचे वृत्त होते. मात्र आज तेज प्रताप यादव यांनी आपल्या भावनांचा उद्रेक थेट ट्विटरद्वारे करत पक्षाविरोधात जाहीर बंड पुकारले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून तेज प्रताप यादव यांनी, “छात्र राष्ट्रीय जनता दल के संरक्षक के पद से मैं इस्तीफा दे रहा हूँ। नादान हैं वो लोग जो मुझे नादान समझते हैं। कौन कितना पानी में है सबकी है खबर मुझे।” असे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे राष्ट्रीय जनता पक्षाच्या विद्यार्थी सेनेच्या पदाचा राजीनामा देखील देत असल्याचे जाहीर केले आहे. तेज प्रताप यादव यांच्या या ट्विटमुळे एकच गोंधळ उडाला असून आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

https://twitter.com/TejYadav14/status/1111229882535694337

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)