घटनापीठातून ललित यांची माघार : अयोध्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

नवी दिल्ली: अयोध्येतील राम जन्मभूमी बाबरी मशिदी प्रकरणातील महत्वाची सुनावणी आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणावरील सुनावणीसाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या 5 सदस्यीय घटनापिठामधून न्यायाधीश यु.यु.ललित यांनी स्वतःला बाजूला केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणीसाठी नव्याने 5 सदस्यीय घटनापीठ स्थापना करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 29 जानेवारीला होणार आहे.

सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापिठापुढे आजपासून या महत्वाच्या सुनावणीला सुरुवात होणार होती. यामध्ये न्या. एस.ए.बोबडे, न्या. एन.व्ही. रामण्णा आणि न्या. डी.वाय. चंद्रचूड यांचाही समावेश होता. मात्र या घटनापिठाचे पाचवे सदस्य असलेल्या न्या. ललित यांच्या समावेशाला मुस्लिम संघटनांच्या वकिलांनी आक्षेप घेतला. न्या. ललित हे यापूर्वी 1994 साली उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यासाठी वकिल होते, असे संबंधितांच्या वकिलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणाची सुनावणी 3 सदस्यीय पिठासमोर करण्याचे पूर्वी निश्‍चित झाले होते. मात्र सरन्यायाधीशांनी ही सुनावणी 5 सदस्यीय घटनापिठासमोर करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयासाठी न्यायालयीन आदेश आवश्‍यक आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. मात्र 5 न्यायाधीशांचे घटनापिठ स्थापन करण्याचा अधिकार सरन्यायाधीश या नात्याने आपल्याला असल्याचे न्या. गोगोई यांनी सांगितले.

अखेर यासंदर्भातील नव्याने घटनापिठाची स्थापना करण्याचे ठरले. यामध्ये न्या. ललित यांचा समावेश असणार नाही. त्यानंतर पुढील सुनावणीची कालमर्यादा निश्‍चित केली जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)