‘लालां’ची रंगपंचमी

हरियाणाच्या राजकारणाला “लालांचे राजकारण’ असेही म्हटले जाते. चौधरी देवीलाल, चौधरी बन्सीलाल आणि चौधरी भजनलाल यांच्यानंतर आता तेथे मनोहरलाल यांचा कार्यकाळ सुरू आहे. होळीच्या सणाच्या निमित्ताने संपूर्ण हरियाणामध्ये उत्साह पाहायला मिळतो. राजकीय नेतेही या रंगोत्सवात सामील होत असतात. हरियाणाच्या या लालांमध्ये चौधरी भजनलाल यांना होळी सर्वाधिक प्रिय होती.

मनोहरलाल केवळफुलांची होळीच खेळतात. त्यामुळे पाण्याची बचत होते, असे सांगतात. चौधरी देवीलाल हे होळीच्या उत्सवानिमित्त नेहमी तेजाखेडा या चौटालांच्या गावी जात आणि तेथे ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांसोबत या सणाचा आनंद लुटत. चौधरी बन्सीलाल हे कडक आणि गंभीर प्रवृत्तीचे राजकीय नेते होते. सणासुदीच्या काळातही त्यांची कामाबाबतची शिस्त कायम असे. होळीच्या दिवशी त्यांना कधीही कुणीही रंगवलेले पाहिले नाही. असं सांगितलं जायचं की, बन्सीलाल यांना रंग आणि फुलांची ऍलर्जी होती. त्यामुळे होळीच्या दिवशी फारसे बाहेर पडत नसत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)