वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा 2018 : लक्ष्य सेनने पटकावले कांस्यपदक

मार्खम – भारताच्या लक्ष्य सेनला वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चँम्पियनशिप स्पर्धेच्या उंपात्य फेरीत पराभव पत्कारावा लागल्याने कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. स्पर्धेतील 19 वर्षाखालील मुलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत कुनलावूत वितिडसर्नने लक्ष्य सेनचा 20-22,21-16,21-13 अशा सेटने पराभव केला.

उपांत्य फेरीतील ही लढत एक तास अन् 11 मिनिटे चालली. जागितक क्रमवारीत कुनलावूत हा 213 व्या , तर भारतीय लक्ष्य सेन हा 90 व्या स्थानावर आहे.

या चँम्पियनशिप स्पर्धेत सात वर्षापूर्वी समीर वर्मा याने कांस्यपदक जिंकले होते, त्यानंतर सात वर्षानंतर लक्ष्य सेनने कांस्यपदक पटकावले आहे. याशिवाय बी.साई प्रणीतने 2010 मध्ये कांस्यपदक जिंकले होते. या स्पर्धेत भारताकडून सुवर्णपदक हे सायना नेहवाल हिच्या नावावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)