टाटा अोपन बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य सेनने पटकावले विजेतेपद

मुंबई – भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने टाटा अोपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंजर बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या गटाचे विजेतेपद पटकावले आहे. पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत व्दितीय मानांकित लक्ष्य सेनने थायलंडच्या कुनलावूत वितिदसरनवर 21-15,21-10 अशी मात करत विजय संपादित केला.

मागील महिन्यात झालेल्या जागतिक ज्यूनियर बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला कुनलावूत वितिदसरनकडून पराभव स्विकारावा लागला होता. मात्र टाटा अोपन इंडिया इंटरनॅशनल चॅलेंजर बॅडमिंटन स्पर्धेत कुनलावूतवर विजय मिळवित लक्ष्य सेनने यावेळी मागील हिसाब बरोबर केला. लक्ष्य सेनचे हे पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद ठरले.

-Ads-

टाटा अोपन बॅडमिंटन स्पर्धा : अस्मिता चाहिलाने पटकावले विजेतेपद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)