नगरपरिषदेकडून लाखोंची उधळण, तरी उपनगर “जैसे थे’

शिंदे यांचे नगरपरिषदेवर टीकास्त्र; रस्ता व ड्रेनेजची कामे न झाल्यास आंदोलन
श्रीगोंदा –
श्रीगोंदा शहर गेल्या अनेक वर्षांपासून झपाट्याने पसरत चालले आहे. येथील उपनगरात नगरपरिषद दरवर्षी लाखो रुपये विविध कामासाठी खर्च करते. लाखोंची उधळपट्टी होऊनदेखील उपनगरातील प्रश्‍न जैसे थेच असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे श्रीगोंदा शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी केला आहे.

उपनगरातील रस्त्याचे, ड्रेनेजची व मुरुमीकरणाची कामे तातडीने सुरू केल्यास, नगरपालिकेसमोर आंदोल करण्याचा इशारा देऊन शिंदे म्हणाले, वाढत चाललेल्या शहराला नागरी सुविधा पुरविण्यास पालिका अपयशी ठरत आहे. येथील शिक्षक कॉलनी व शाहू नगरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून लोक राहत आहे. सध्या येथे 400 कुटुंब राहतात.

या उपनगरात नगरपरिषदेचा एकही रस्ता नाही. मात्र दरवर्षी याठिकाणच्या रस्तासाठी लाखो रुपये कागदावरच खर्च केले जातात. पावसाळ्यात येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता नगरपरिषदेने तातडीने कामे हातात घेऊन, उपनगरातील मुरुमीकरण, पक्के रस्ते व ड्रेनेजची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावते. अन्यथा कोणतीही पूर्व सूचना न देता उपनगरातील नागरिकांसह पालिकेसमोर आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)