लोणंद बसस्थानकात दीड लाखांचे दागिने लंपास

बसस्थानकामधील पोलिस चौकीचा विषय पुन्हा ऐरणीवर

सौ. रुपाली कांतीलाल राऊत या सोमेश्‍वर येथून पुजेचा कार्यकम उरकून लोणंद बसस्थानकात आल्या. व येथून पुढे म्हावशी ता. खंडाळा येथे जाण्यासाठी एसटीबस मध्ये बसलेल्या असताना अज्ञात व्यक्तीने सोन्याचे दागिने लम्पास केले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याचा पुढील तपास लोणंद पोलिस करीत आहेत.

लोणंदमधील चोऱ्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून अवघ्या एक दिवस आधी लोणंदच्या तीन मंदिरात चोरट्यांनी आपला हात साफ केलेला. हे कमीच का काय म्हणुन काल रात्री तुळजाभवानी मंदिरात पुन्हा एकदा चोरट्यांनी कपाटे फोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पहाटे चारच्या सुमारास विकी माने यांच्या मालकीची आईशर प्रो ही सहा चाकी गाडी क्रमांक एमएच-11-एएल 4231 लोणंद येथुन चोरीस गेली आहे.लोणंद मधे ठिकठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत . परंतु या कॅमेऱ्यांचा रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी फारसा ऊपयोग होताना दिसत नाही. हे कॅमेरे रात्रीच्या अंधारात चांगल्या दर्जाचे चित्रीकरण करण्यासाठी कुचकामी ठरत आहेत.

धार्मिक ठिकाणे व परिसरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उद्या कदाचित धार्मिक भावना दुखावणारे कृत्य अशा चोरांकडून घडुन शहरातील सामाजिक शांतता भंग होऊ शकतो यासाठी योग्य रितीने पोलीसांनी दखल घेतली पाहिजे तसेच आपण नागरिकांनी जागरूक व दक्ष राहिले पाहिजे. तसेच संबंधित विश्‍वस्तांनी अशा धार्मिक ठिकाणी चांगल्या दर्जाचे सीसीटिव्ही बसवून सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करणे आवश्‍यक आहे.

– कय्युमभाई मुल्ला ( सामाजिक कार्यकर्ते)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)