माण तालुक्‍यात दुष्काळ पडल्याने तलाव, बंधारे विहीरी कोरड्या

बिदाल – यंदा माण तालुक्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची भीषण स्थिती निर्माण होण्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य वेळेतच लक्षात घेऊन आत्ताच योग्य नियोजन करण्याची गरज आहे.  यंदा तालुक्‍यातून मान्सूनने वेळे अगोदरच घेतलेली एग्झिट अत्यंत धक्कादायक आहे. तज्ञांच्या मते यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षाही भीषण असेल.

सर्वप्रथम पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या या भागात निर्माण होणार आहे. तालुक्‍यातील जवळपास सर्वच स्रोत आठलेले आहे. रांणद, पिंगळी, आंधळी, गंगोती या तलावात येथील तलाव निरंक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर्षी वळवाचा पाऊस सोडला तर मोठा पाऊसच झाला नाही. परिणामी पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबर महिना सुरू आहे पण ऑक्‍टोबरची आत्ताच मे महिन्याची वाटत आहे. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वसामान्यपणे ऑगस्टच्या अखेरीस शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सुगी आटोपून रब्बी हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरु असते. मात्र, या वर्षी तालुक्‍यातील कोणत्याच गावातील शिवारात अशी धावपळ दिसत नाही. शिवार ओसाड पडलेले दिसत आहे. जमिनीत कसलीही ओल नसल्याने शेतकरी हात बांधून आभाळाकडे नजर लावून बसला आहे. येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. माण तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी शासनाने तातडीने उपाययोजनांना सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
झालेल्या खरीब हंगामातील पीक शेतकऱ्यांनी काढले असून रब्बी हंगामातील पीकाची पेरणी सुरु झाली आहे .परंतू शेतामध्ये पुरेशी ओल नसल्याने व येणाऱ्या काळात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक येतील का नाही हे सांगता येत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल असे चित्र दिसत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)