लेडी गागाने साखरपुडा मोडला

हॉलिवूडमधील गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा हिने क्रिश्‍चियन कारिनोबरोबर झालेला साखरपुडा मोडला आहे. लेडी गागाच्या प्रतिनिधीने या बातमीला दुजोरा दिला आहे, असे एका इंग्रजी वेबसाईटने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच लेडी गागा आणि क्रिश्‍चियन कारिनोमधील नाते संपुष्टात आलेले आहे, पण हे नाते कधी संपुष्टात आले, याची निश्‍चित माहिती या प्रतिनिधीने दिली नाही. एखादी असाईन्मेंट कधी संपली ते सांगता येऊ शकेल, पण नाते कधी संपले हे कसे सांगता येऊ शकेल, असा उपहासात्मक प्रश्‍न या प्रतिनिधीने विचारला.

लेडी गागा आणि क्रिश्‍चियन कारिनोमध्ये गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये साखरपुडा झाला होता. त्यापूर्वी लेडी गागा आणि ऍक्‍टर टेलर किन्नी यांच्यातही रिलेशनशीप होते, पण जुलै 2016 मध्ये ते दोघे विभक्‍त झाले आणि लेडी गागा पुन्हा नव्या जोडीदाराच्या शोधासाठी रिकामी झाली होती. वर्षभरातच तिचे आणि क्रिश्‍चियन कारिनोचे सूत जुळले होते. पण काही गोष्टी “मटेरियलाईज्ड’ होण्यापूर्वीच बिनसल्या आहेत. अगदी अलीकडे लेडी गागा चर्चेत आली होती, ती “मी टू’ अभियानाशी संबंधित काही सनसनाटी कॉमेंटमुळे…गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्ये लेडी गागाने “वुमन इन हॉलिवूड’ समारंभामध्ये जे भाषण केले होते, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले होते. वयाच्या 19 व्या वर्षीच आपले लैंगिक शोषण झाले होते, हे तिने या स्टेजवरून अगदी न बिचकता सांगितले होते. आपले लैंगिक शोषण करणारी व्यक्‍ती हॉलिवूडमधील प्रथितयश असल्याने आजही त्या व्यक्‍तीचे नाव घ्यायला आपल्याला भीती वाटत असल्याचे तिने सांगितले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रिश्‍चियन कारिनोने दिलेली अंगठी ती सध्या घालत नाही. क्रिश्‍चियनही तिच्याबाबत बोलत नाही. हे समीकरण अगदी अलीकडे म्हणजे ग्रॅमी ऍवॉर्डच्या समारंभानंतरच बिघडले आहे. इतक्‍यातच ही केमिस्ट्री बिघडल्याचे दुःख दोघांच्याही फॅन्सला झाले आहे. लेडी गागाला आता असा पार्टनर हवा आहे, जो दशकानुदशके तिची साथ देऊ शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)