कंपन्यांना कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा 

भारतातील कंपन्यांनाही नोकर भरतीवेळी
येतात अडचणी
आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण वाढविण्याची आवश्‍यकता

नवी दिल्ली,आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक कंपन्यांमध्ये कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे. गेल्या 12 वर्षांतील ही सर्वात मोठी कमतरता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या 10 बाजारपेठांमध्ये भारताचाही समावेश आहे. भारतातील 56 टक्के कंपन्यांनी रिक्‍त जागा भरण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.

मॅनपॉवर ग्रुप या कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या टॅलेन्ट शॉर्टेज सर्वेफमध्ये जगभरातील 40 हजार कंपन्यांना सहभागी करण्यात आले. यापैकी 45 टक्के कंपन्यांनी जागा भरण्यासाठी योग्य कर्मचारी निवडताना समस्या येत आहे, असे म्हटले. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कौशल्याचा अभाव दिसून येत आहे. योग्य पदासाठी कर्मचाऱ्यांची निवड करणे हे आव्हान आहे. त्यामुळे कौशल्य सुधारणे आवश्‍यक आहे, असे मॅनपॉवर ग्रुपचे प्रमुख व सीईओ जोनास प्रायसिंग यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या कंपन्यांमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक आहे. दीर्घ काळासाठी कर्मचाऱ्यांतील गुणवत्ता प्रगत होणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक गुणवत्तेचा फटका बसणाऱ्या देशांत अव्वलस्थानी जपान असून तेथे 89 टक्‍के तुटवडा भासत आहे. यानंतर रोमानिया 81 टक्‍के आणि तैवान 78 टक्‍के यांचा क्रमांक लागतो. सध्या कंपन्या डिजिटल आणि सुधारणावादी होण्यावर भर देत आहेत. तांत्रिक कौशल्य आणि संवाद, सहकार्य आणि समस्या सोडवणूक यासारखे महत्त्वाचे प्रश्‍न सोडविणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. अनेक कर्मचाऱ्यांमध्ये अनुभव, कष्ट करण्याचा अभाव दिसून येत आहे. चीनमध्ये योग्य कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्याची निवड करताना सर्वात कमी समस्या येत असून त्या 13 टक्‍के आहेत. यानंतर आयर्लंड 18 टक्‍के, ब्रिटन 19 टक्‍के आणि स्पेन 24 टक्‍के यांचा क्रमांक लागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)