मसूरसह सहा ग्रामपंचायतींवर वर्चस्व

कराड – कराड तालुक्‍यातील पहिल्या टप्प्यातील एक बिनविरोध वगळता एकूण पाच ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक निकाल सोमवारी जाहीर झाला. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मसूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. बाळासाहेब पाटील गटाचे वर्चस्व अबाधित राहीले आहे. तालुक्‍यातील वडोली निळेश्‍वर, वाण्याचीवाडी, माळवाडी, राजमाची याठिकाणीही हाच फॉर्मुला लागू पडला आहे. पहिल्या टप्प्यातील यादववाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुक निकाल सोमवारी येथील रेव्हुन्युु क्‍लब याठिकाणी मतमोजणीनंतर जाहीर करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत आपला आनंद द्विगुणीत केला. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मसूर ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारांची सत्ता कायम राहीली आहे. सरपंच हे थेट जनतेमधून असल्याने याठिकाणी सरपंचपदाचा पहिला मान पंकज दिक्षित यांना मिळाला. तसेच तालुक्‍यातील वडोली निळेश्‍वर, वाण्याचीवाडी, माळवाडी, राजमाची या ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी हाच फॉर्मुला लागू पडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडोली निळेश्‍वर सरपंचपदी मंदा हणमंत साळुंखे, वाण्याचीवाडी सरपंचपदी प्रदीप पोपट मोरे, माळवाडी सरपंचपदी धनंजय सदाशिव शेलार, राजमाची सरपंचपदी शिवाजी लक्ष्मण डुबल यांना लोकनियुक्त सरपंचाचा पहिला मान मिळाला आहे. यादववाडी ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली आहे. एकंदरीतच पहिल्या टप्प्यातील सहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व आ. बाळासाहेब पाटील गटाचेच वर्चस्व अबाधित राहिले आहे. याठिकाणी भाजपा अथवा अन्य कोणत्याच पक्षाला शिरकाव सुध्दा करता आलेला नसल्याचे निकालावरुन दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)