व्याजदर वाढण्याची शक्‍यता कमी 

पतधोरण समितीची बैठक सुरू : घाऊक महागाई आटोक्‍यात 

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. यावेळी रिझर्व्ह बॅंक व्याजदर जसेच्या तसे ठेवण्याची जास्त शक्‍यता विश्‍लेषकांना वाटते. महागाई कमी झाली आहे. त्यामुळे मंदावलेला विकासदर वाढता ठेवण्यासाठी व्याजदरात कपात करण्यास वाव असला तरी रिझर्व्ह बॅंक सावध पवित्रा घेऊन व्याजदर “जैसे थे’ ठेवण्याची शक्‍यता त्यांना वाटते.

जून महिन्यातील आणि त्यानंतरच्या परधोरणात रिझर्व्ह बॅंकेने एकापाठोपाठ व्याजदरात वाढ केली होती. नंतर रुपया कोसळल्यामुळे आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे व्याजदर वाढीची अपेक्षा असतानाही रिझर्व्ह बॅंकेने या अगोदरच्या पतधोरणावेळी व्याजदर “जैसे थे’ ठेवले होते. मात्र, रुपया आणि इंधनामुळे व्याजदर वाढीची शक्‍यता खुली ठेवली होती. दरम्यानच्या काळात रुपया चांगला सावरला आहे. त्याचबरोबर इंधनाचे दर कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात महागाईचा घाऊक दर नियंत्रणात असल्याची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. मात्र, विकासदरात थोडीशी घट झाली आहे.

आज सोमवारपासून रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. ही बैठक तीन दिवस चालणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 5 जून रोजी बॅंक आपले पतधोरण जाहीर
करणार आहे.

या अगोदरचे पतधोरण जाहीर झाले तेव्हा क्रुडचे दर 86 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले होते. त्याचबरोबर एका डॉलरसाठी 76 रुपये द्यावे लागत होते. आता एका डॉलरसाठी केवळ 70 रुपये द्यावे लागत आहेत. त्याचबरोबर क्रुडचे दर 60 डॉलरवर आले आहेत. मात्र दुसऱ्या तिमाहीतील विकासदर 7.1 टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे विकासदर वाढण्यासाठी व्याजदर कपातीस वाव असल्याचे उद्योजकांच्या संघटनांना वाटते.

खरीपाचे पीक चांगले आहे त्याचबरोबर पिकाचे दर सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत दराच्या कमी आहेत. मात्र इतर क्षेत्रात महागाई वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदर कमी करणार नसल्याचे कोटक संशोधन संस्थेला वाटते. आगामी काळातही व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता कमी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)