श्रमिक मुक्ती दलाचा उद्या निर्णायक मेळावा !

सातारा : समन्यायी विकास, सर्वांचा विकास या मागणीसह प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे मागील 40 पेक्षा अधिक दिवसांपासून राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहचले आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय उद्या दि.22 रोजी पंढरपूर येथील मेळाव्यात होणार आहे.

डॉ. भारत पाटणकर यांनी या बाबतची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, पोलीस अधिक्षक यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी 23 रोजी बैठक लावावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, समन्यायी विकास, सर्वांचा विकास झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ज्या घटकांनी विकासासाठी त्याग केला त्यांना सन्मानाचे स्थान मिळायला हवे. यासाठी आंदोलन सुरू आहे. या मागणीवर होळी सणा दिवशी मुख्यमंत्र्याच्या ‘वॉर रूम’ मध्ये चर्चा झाली. त्या चर्चेबाबत उद्याच्या पंढरपूर येथील मेळाव्यात उहापोह होईल. त्यानंतर पुढचा निर्णय प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलन स्थळी जावून होईल. त्याच बरोबर बऱ्याच प्रश्नांची उकल ही लोकसभेच्या निकाला नंतर होणार आहे. त्यामुळे निकालाच्या तिसऱ्या दिवशी 25 मे रोजी पत्रकार परिषदेत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली जाईल, असे पाटणकर यांनी सांगितले.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन रजिस्टरचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्या देखील मागणीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 40 पेक्षा अधिक दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उद्याच्या पंढरपूरच्या मेळाव्याला जाणार आहेत. पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक यांनी संपर्क साधत आंदोलनाची पुढील दिशा आणि पंढरपूरला होणाऱ्या मेळाव्याबाबतची माहिती डॉ. पाटणकर यांच्याकडून घेतली. यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान सातारा जिल्ह्यातील प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी 23 मार्च रोजी बैठक निमंत्रित करावी, अशी अपेक्षा पोलीस अधीक्षक यांच्याकडे व्यक्त केली असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)