नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. कर्नाटकमध्ये सध्या भीषण दुष्काळ पडला असून राज्यातील दुष्काळ निवारणाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा अशी मागणी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
या भेटीदरम्यान कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील शेतकरी कर्ज माफीच्या अंमलबजावणीबाबत देखील माहिती दिली. कुमारस्वामी यांनी मोदी यांच्याकडे मनरेगा कामांचा निधी लवकरात लवकर राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली आहे.