कर्नाटक सरकार उलथून टाकण्यासाठी कुमारस्वामींना भाजपची मोठी ऑफर : देवेगौडांचा गौप्यस्फोट

माजी पंतप्रधान तथा जेडीएसचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांनी आज भाजपवर गंभीर आरोप लावले आहेत. भाजपतर्फे देवेगौडा यांचे पुत्र तथा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना देशातील लोकसभा निवडणुकांपूर्वी कर्नाटकात भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे अशी ऑफर देण्यात आली होती असा गौप्यस्फोट एच.डी.देवेगौडा यांनी केला आहे.

कुमारस्वामी यांना भाजपाची ही ऑफर स्वीकारण्यासाठी मोठ्या रकमेचे आमिष देखील दाखविण्यात आले होते, भाजपतर्फे त्यांना ही रक्कम स्वीकारण्यासाठी मुंबई येथे बोलाविण्यात आले होते मात्र कुमारस्वामी यांनी भाजपची ही ऑफर धुडकावून लावली. अशी माहिती देखील त्यांनी दिली.

https://twitter.com/ANI/status/1111252379536506881

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)