एसएसबीच्या प्रमुखपदी कुमार राजेश चंद्रा

नवी दिल्ली: केंद्र सरकारने एसएसबी म्हणजेच सशस्त्र सीमा बलच्या प्रमुखपदी वरीष्ठ आयपीएस अधिकारी कुमार राजेश चंद्रा यांची नियुक्ती केली आहे. ते सध्या नागरी विमान वाहतूक खात्याचे सुरक्षा प्रमुख म्हणून काम पहात होते. ते 1985 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. त्यांची आज एसएसबी महासंचालकदी झालेल्या नियुक्तीची मुदत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असेल. ते मे 2016 पासून नागरी विमान वाहतुक विभागात सुरक्षा प्रमुख म्हणून काम पहात होते.

सीमा सुरक्षा बल ही सुरक्षा संस्था नेपाळ आणि भूतान सीमेवर संरक्षण करण्याचे काम करते. या संस्थेकडे 80 हजारांचे संख्याबळ आहे. दोन्ही देशांच्या सीमा भागातून होणारी घुसखोरी आणि स्मगलिंगचेप्रमाण रोखण्याची महत्वाची जबाबदारी या संस्थेकडे आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)