#INDvAUS : चहलपेक्षा कुलदीप अवघड – हेडन

कुलदीप यादव हा शेन वॉर्नप्रमाणे हवेच्या झोतातच चेंडू वळवतो. त्याचे हे कौशल्य त्याच्या गोलंदाजीला अधिक प्रभावी बनवते. त्यामुळे युझवेंद्र चहलपेक्षा कुलदीप यादवची गोलंदाजी खेळायला अधिक अवघड आहे, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने कुलदीपची प्रशंसा केली.

कुलदीप हा चेंडू किती वळवतो, हे बघू नका. ते त्याचे बलस्थानच नाही. मात्र तो ज्याप्रमाणे हवेतच चेंडूला फिरवतो आणि वॉर्नप्रमाणे त्याचा चेंडू ज्या प्रकारे फलंदाजापर्यंत पोहोचतो, ते त्याचे वैशिष्ट्य आहे. त्या तुलनेत चहलला आत्मविश्‍वासाने खेळता येऊ शकते असे वाटत असल्याचे हेडनने नमूद केले. चहल हा यष्टींवरच अधिक मारा करण्यावर भर देतो. त्यामुळे त्याचे चेंडू हवेत दिशा बदलत नाहीत. त्यामुळे कुलदीपपेक्षा चहलचा सामना करणे फलंदाजांना सोपे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)