ICC T20I Rankings : क्रमवारीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी

दुबई – न्यूझीलंड विरूध्द टी20 मालिकेत एका सामन्यात चांगली कामगिरी करत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने गोलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कुलदीप यादव याला पहिल्या दोन ती20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती पण हॅमिल्टनमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने 26 धावा देत 2 बळी मिळवले होते. गोलंदाजीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान हा पहिल्या स्थानी कायम आहे.

गोलंदाजीत टाॅप 10 मध्ये कुलदीपशिवाय इतर कोणताही भारतीय गोलंदाज नाही आहे. युजवेंद्र चहल यांच्या क्रमवारीत 6 ने घसरण झाली असून तो 17 व्या स्थानी पोहचला आहे. तर भुवनेश्वर हा 18 व्या स्थानी आहे.

भारताने रविवारी झालेला अखेरचा सामना 4 धावांनी आणि मालिका 2-1 ने गमावली. यानंतर भारताचे दोन अंक कमी झाले असले तरी पाकिस्ताननंतर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)