कुकडी आवर्तनाचा खरीप पिकांना दिलासा

कर्जत -कर्जत तालुक्‍यात कुकडीचे आवर्तन सुटल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. पिकांना पाणी देऊन शेततळी भरून घेण्यासाठी कुळधरण भागातील शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे. कुळधरण येथील डीवाय 15 चारीला पाणी सुटले आहे. त्याखालील कुळधरण, राक्षसवाडी,कोपर्डी आदी भागातील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी व्यस्त आहेत. सध्या शेतातील कांदा, ऊस, कडवळ, मका, बाजरी आदी पिकांना आवर्तनाचा दिलासा मिळत आहे.

येसवडी चारीवरील पिंपळवाडी, तळवडी, येसवडी, करमनवाडी या भागातील क्षेत्र आवर्तनातून भिजवले जाते. आवर्तनामुळे टोमॅटो, काकडी,डाळींब, द्राक्षे आदी फळबागांना फायदा होत आहे. अनेक शेतकरी शेताजवळील नाले, बंधारे भरून घेण्यासाठी धडपड करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी विहिरीतच आवर्तनाचे पाणी सोडून पाण्याचा साठा करून ठेवण्याचा मार्ग अवलंबला आहे. आवर्तनामुळे भूजलपातळीत वाढ होत आहे. त्याचा पुढील एक-दीड महिने फायदा होणार आहे. आवर्तनाने विहिरी, कूपनलिकांना पाणी वाढते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना पुढील काळात होतो.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)