प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये मोफत वायफाय

मुंबई – उत्तर प्रदेशातील अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज येथे 15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रयागराज कुंभमेळा 2019 साठी साधारण बारा कोटी भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मौनी आमावस्या दिवशी तीन कोटी भाविक येतील अशी अपेक्षा असून 20 लाख भाविक येतील असा अंदाज आहे या दहा लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश असणार आहे. तसेच या कुंभमेळ्यामध्ये मोफत वायफायची सुविधा करण्यात आली आहे.

कुंभ मेला 2019 बाबत कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले हा कार्यक्रम देशात चार ठिकाणी आयोजित केला जातो प्रयागराज येथे होणारा हा कार्यक्रम हे आकर्षण स्थान असून देशातच नव्हे तर परदेशातही याबाबत उत्सुकता दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे युनेस्कोतर्फे कुंभमेळ्याची गणना मानवी संस्कृती तील अद्वितीय सांस्कृतिक वारसा या यादीत केली गेली आहे. तसेच यावेळी कुंभमेळासाठी येणाऱ्या भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची माहिती त्यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा भागामध्ये आलीशान टेण्ट सिटी स्थापन करण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व व्यवस्थित पार पडावे, यासाठी 30 थिमॅटिक गेट्‌स उभारण्यात आली असून या ठिकाणी 200 हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. त्यानाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)