केटीएम १२५ भारतात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

केटीएम या स्पोर्ट्स बाईकची भारतीय तरुणांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. परंतु केटीएम बाईक्सच्या चढ्या किमतींमुळे अनेकांना ही बाईक घेणे परवडणारे न्हवते यामुळेच एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईकचे बजेट असणाऱ्यांसाठी केटीएम बाईक घेणे शक्य होत नसतं. केटीएमने आता अशा एंट्री लेव्हल स्पोर्ट्स बाईकचे बजेट असणाऱ्यांसाठी केटीएम १२५ ड्यूक ही नवी बाईक भारतामध्ये सादर केली आहे.

केटीएम १२५ ड्यूक मध्ये १२४.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन वापरण्यात आले असून इंजिनची ताकद ६ गिअर्स मध्ये विभागण्यात आली आहे. या बाईकचे डिझाईन हे केटीएम ड्यूक ३५० शी मिळते जुळते असून फीचर्सच्या यादीमध्ये एबीएस, अल्युमिनियम स्विनग्रम, मोनो सस्पेन्शन, डिस्क ब्रेक या फीचर्सचा समावेश आहे.

-Ads-

१२५ सीसी इंजिन सेगमेंट मधील ग्राहक हे ताकदीपेक्षा इंधनाच्या बचतीकडे जास्त लक्ष देत असतात मात्र १२५ सीसी सेगमेंट मध्ये रेसिंग बाईक शोधणाऱ्यांसाठी ड्यूक १२५ चांगला पर्याय ठरेल अशी कंपनीला अपेक्षा आहे. कंपनीने भारतीय बाजारामध्ये या बाईकची एक्स शोरूम प्राईझ १.१८ लाख एव्हडी ठेवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup: Thumbs up
93 :heart: Love
14 :joy: Joy
15 :heart_eyes: Awesome
14 :blush: Great
16 :cry: Sad
15 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)