….म्हणून मल्लिकार्जुन खर्गे सुध्दा कर्नाटकचे मुख्यमंत्री होऊ शकले नाही -जी. परमेश्वर

बंगळुरु : दलित असल्यामुळे मला तीन वेळा मुख्यमंत्री बनण्यापासून रोखण्यात आले, असे विधान सध्याचे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी केले आहे. ते दावणगेरे येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पी. के. बसवलिंगप्पा आणि के.एच. रंगनाथ यांच्यासोबतच सुध्दा असेच झाले, त्यामुळे तेही मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. याच कारणामुळे आमचे मोठे बंधू  मल्लिकार्जुन खर्गे सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले नाहीत. मी स्वत: तीन वेळा मुख्यमंत्री पदापासून वंचित राहिलो. मात्र, काहीशा संघर्षानंतर मला उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. दलित नेत्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली नाही. सरकारमध्ये सुद्धा दलितांसोबत भेदभाव होत आहे, असही त्यांनी म्हटलं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबदल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांना विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस पार्टी ही दलित आणि इतर दुर्लक्षित असलेल्या समाजाची काळजी घेणारा पक्ष आहे. मला माहित नाही की त्यांनी असे विधान का केले. याबदल आपण त्यानांच विचारलेले बरे.

कर्नाटकातील जेडीएस आणि काँग्रेसचे सरकार आपल्या मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावरुन नेहमीच चर्चेत राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)