कृष्णा-भीमा स्थिरीकरण तीन पिढ्या अशक्‍य : संजय शिंदे

रांझणी गावातून फोडला प्रचाराचा नारळ

माढा – राष्ट्रवादीचे नेते म्हणून जे जिल्ह्यात वाढले. ते आता आपल्या स्वार्थासाठी भाजपात गेले. ते कृष्णा-भीमा स्थिरीकरणासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याचे सांगत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही योजना होणार नाही असे अनेकदा सांगितले आहे. पुढच्या तीन पिढ्या हे स्थिरीकरण शक्‍य नाही. मग नक्की कोणाचे स्थिरीकरण करण्यासाठी हे भाजपात गेले? असा सवाल उपस्थित करीत संजय शिंदेंनी मोहिते-पाटलांवर नाव न घेता टीका केली.

शनिवारी माढ्यातील रांजणी येथे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बबन शिंदे, माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या नेतृत्वाने गेल्या दहा वर्षात अनेक चुका केल्या. त्या विरोधात मी राजकारण केले. भले भाजपच्या संपर्कात होतो. मात्र पवार साहेब आणि अजित दादांच्या विचारापासून दूर गेलो नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांनी माढ्यातील रांझणी येथील ओंकारेश्वर मंदिरातून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.

मोहिते-पाटलांना शरद पवार यांनी दहा वर्ष राजकारणात विविध पद दिली. ग्रामीण भागात मोडीत निघालेल्या भांड्याना जस कलई करतात तस कलई करून पवार यांनी सत्तेत टिकवल. पण आज लोकांना समजलय ही मोडीत निघालेली भांडी आहेत. कलई केलेली भांडी अशी खिल्ली शिंदे यांनी उडवली. माढा मतदारसंघातील भाजपचा उमेदवार ठरला नसताना संजय शिंदे यांची प्रचार सुरूवात आक्रमक पध्दतीने झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)