#क्रीडांगण : अंजूम, अपूर्वीचे लक्ष्य आॅलिंपिक पदकाचे (भाग २) 

अंजूम, अपूर्वीचे लक्ष्य आॅलिंपिक पदकाचे (भाग १)

-अमित डोंगरे

आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी यंदा अनपेक्षित यश मिळवले. त्यातही महिला खेळाडूंनी वरचष्मा ठेवला. भारताला मिळालेल्या एकूण पदकांपैकी सत्तर टक्के पदके ही महिला खेळाडूंनी मिळवली आहेत. आता या खेळाडूंबरोबरच जागतिक स्पर्धेतून पात्र ठरलेल्या खेळाडूंनाही टोकीयो-2020 ऑलिंपीकचे स्वप्न पडू लागले आहे. अंजूम मोदगिल आणि अपूर्वी चंडेला या दोघीनी जागतिक नेमबाजी स्पर्धेत सरस कामगिरी करत ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे.

स्वप्ना बर्मन, राही सरनोबत, द्युती चंद, हिमा दास, दिपा कर्माकर, सिमा पुनिया, दीपीका कुमारी या खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत आपला ठसा उमटवला. आता येत्या ऑलिंपिक स्पर्धेत या खेळाडूंबरोबरच अंजूम आणि अपूर्वी यांच्याकडूनही पदकाच्या आशा निर्माण झाल्या आहेत.

घराची बेताची परिस्थिती, त्यात अचानक उद्‌भवलेल्या आजारांशी करावा लागलेला सामना, अशी अनेक अडथळयांची शर्यत स्वप्ना बर्मन घरीही पार करतच होती. म्हणूनच की काय एशियाडमधल्या अडथळा शर्यतीसह अन्य क्रीडा प्रकारांचे आव्हान तिने लीलया पेलले आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक कमावले. हेप्टॅथलॉन प्रकारात स्वप्नाने भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

स्वप्नाच्या यशाने तिच्या रिक्षाचालक वडिलांना आभाळ ठेंगणे झाले आहे. आईच्या तोंडातून तर शब्दही बाहेर पडत नव्हते. तिने थेट घरातील देवीच्या मंदिरात माथा टेकला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. स्वप्नाचे यश खरंच तिच्यासाठी सोपे नव्हते. स्वप्नाच्या दोन्हा पायांना 6-6 बोटे आहेत. त्यामुळे आपल्या पायांसाठी योग्य बुट मिळवताना तिला नेहमीच संघर्ष करावा लागला. पावलाच्या बोटांच्या भागाच्या अतिरिक्‍त रुंदीमुळे तिचे लॅंडिंगही कठीण व्हायचे आणि बूट सतत फाटायचे. मात्र, याची तक्रार न करता तिने सुवर्णयश खेचून आणले.

आसाममधील एका छोटया गावात राहणाऱ्या हिमाला पाच भावंडे आहेत. शाळेत असताना हिमाला फुटबॉल खेळायला फार आवडे. मात्र तिच्या सोबतच्या मुलींना फुटबॉल खेळण्यात काहीही रस नव्हता. मग हिमा मुलांमध्ये खेळण्यासाठी जात होती. तिची खेळाप्रतीची निष्ठा पाहून शाळेतील शिक्षकांनी तिला ऍथलेटिक्‍समध्ये येण्याचा सल्ला दिला. कुठल्याही सुविधा नसतानाही ती भाताच्या शेतात धावण्याचा सराव करीत होती. तिच्यातील गुणवत्ता बघून तिला प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला सरावासाठी जाण्यास सांगितले. सुरुवातीला वडिलांचा विरोध होता.

मात्र, नंतर त्यांचाही तिला पाठिंबा मिळाला. इंडोनेशिया एशियाडमध्ये तीन पदके मिळवून तिने आपल्यातील गुणवत्ता सिध्द केली. अगदी हलाखीच्या परिस्थितीतून द्युती चंद ऍथलेटिक्‍समध्ये आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर ती झळकतच होती, तेवढयात 2014 मध्ये तिच्यावर आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स फेडरेशनने निलंबनाची कारवाई केली.

पुरुष संप्रेरकांचे प्रमाणासंदर्भातील धोरणानुसार तिच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. तिच्या शरीरात ही संप्रेरके अधिक प्रमाणात आढळली होती. तिन त्याविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली आणि तो खटला तिने जिंकला. दरम्यान, गोपीचंद यांच्या ऍकॅडमीत राहून सराव केला. गोपीचंद यांनी तिला शक्‍य ती सारी मदत केली. आपल्या कामगिरीच्या जोरावर तिने एशियाडमध्ये भारताच्या खात्यात दोन पदके जमा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)