भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा : एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेरचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे – दुहेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, एकेरीत स्वीडनच्या इलियास यमेरने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत येथे होत असलेल्या एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या अंतीम फेरीत धडक मारली आहे.

-Ads-

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या एन विजय सुंदर व रामकुमार रामनाथन या जोडीने स्लोव्हाकियाच्या आंद्रेज मार्टिन व चीनच्या हंस पॉडलिपींक कॅस्टीलो यांचा टायब्रेकमध्ये 7-6 (7), 6-0 असा एकतर्फी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

यावेळी दोघांनीही सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी खेळाडूंवर दबाव टाकला होता. मात्र, स्लोव्हाकियाच्या आंद्रेज मार्टिन व चीनच्या हंस पॉडलिपींक कॅस्टीलोयांनी पहिल्या सेट मध्ये तोडीस तोड खेळ करत जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र, दुसऱ्या सेट मध्ये एन विजय सुंदर आणि रामकुमार रामनाथनयांनी त्यांना प्रतिकाराची कोणतीही संधी दिली नाही सामन्यात विजय आपल्या नावे केला.

तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत तैपेईच्या हसीह चेंग पेंग व यांग सुंग हुआ या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्‍स पुरसेल व लूक सेव्हिल यांचा (4)6-7, 6-3, 10-6असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

एकेरीत उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरचा 6-3, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. तर, दुसऱ्या एकेरीतील सामन्यात प्रजनेश गुन्नेश्वरणने मालदोवियाच्या राडू एल्बोटचा 1-6, 6-4, 6-4 असा पराभव करत अंतीम फेरी गाठली.

सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी):

इलियास यमेर (स्वीडन) (3) वि.वि. ब्रेडन चेन्यूर (कॅनडा) 6-3, 3-6, 6-3, प्रजनेश गुन्नेश्वरण (भारत) (4) वि. राडू एल्बोट (मालदोविया) (1) 1-6, 6-4, 6-4.

दुहेरी गट: उपांत्य फेरी:

हसीह चेंग पेंग(तैपेई)/यांग सुंग हुआ(तैपेई) वि.वि. मॅक्‍स पुरसेल(ऑस्ट्रेलिया)/लूक सेव्हिल(ऑस्ट्रेलिया) 6-7, 6-3, 10-6, एन विजय सुंदर(भारत)/रामकुमार रामनाथन(भारत) वि.वि. आंद्रेज मार्टिन(स्लोव्हाकिया)/हंस पॉडलिपींक कॅस्टीलो (चीन) 7-6(7), 6-0.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)