कोयना प्रकल्पग्रस्तांनी साजरी केली शिवजयंती

आठव्या दिवशीही आंदोलन सुरूच

नवारस्ता  – कोयना प्रकल्पग्रस्त हे छ. शिवाजी महाराजांचे शूरवीर मावळे आहेत. कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर सुरू असलेले ठिय्या आंदोलन हे शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याप्रमाणे कोयनेसह राज्यभर सुरू आहे. शिवरायांच्या स्वराज्यात सर्व सामान्य जनतेला न्याय मिळत होता. पण गेल्यावर्षी कोयनेत 23 दिवस, सातारा येथे 4 दिवस व आता कोयनानगर येथे गेले 8 दिवस कोयना प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

जिल्हा प्रशासन अजुनही झोपेचे सोंग घेऊन आहे. आताचे सरकार न्याय देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कोयना प्रकल्पग्रस्तांनी शिवजयंती निमित्ताने व्यक्त केली आहे. कोयनानगर ता. पाटण येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्‍यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच असून मंगळवारी 8 व्या दिवशी आंदोलन स्थळी प्रकल्पग्रस्त जनतेने शिवजयंती साजरी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवरायांना अभिवादन करून शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ यावेळी हजारो प्रकल्पग्रस्तांनी घेतली. कोयनेचे प्रकल्पग्रस्त भुमीपूत्र आपल्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत असून लॉंगमार्च काढून कोयना प्रकल्पग्रस्तांसह राज्यभरातील 9 जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने आंदोलनात बसलेले धरणग्रस्त, अभयारण्यग्रस्त, दुष्काळग्रस्त जनतेचे वादळ येत्या काही दिवसांत मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर धडकणार आहे. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक चैतन्य दळवी, तालुकाध्यक्ष संजय लाड, मुंबई कमेटी अध्यक्ष बाजिराव कदम, सचिव महेश शेलार, उपाध्यक्ष दाजी पाटील, डि डि कदम, संघटक सचिन कदम, विठ्ठल सपकाळ, संभाजी चाळके, श्रीपती माने,राजु मोरे, सिताराम पवार, संतोष कदम, शैलेश सपकाळ उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वक्‍तव्याचा निषेध

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव येत असून आम्हास त्रास होत आहे. असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते त्या वक्तव्याचा प्रकल्पग्रस्तांनी जाहीर निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)