कोरेगाव भीमा प्रकरणी निकाल राखीव

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारच्या आव्हान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय राखून ठेवला. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची 90 दिवसांची मुदत आणखीन 90 दिवसांनी वाढवून देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी स्थानिक न्यायालयासमोर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले अहे. पुणे पोलिसांनी या संदर्भात वकिल सुरेंद्र गडलिंग, नागपूर विद्यापिठातील प्राध्यापक शोमा सेन, दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळचे रहिवासी रोना विल्सन यांना माओवाद्यांशी संबंधित असल्याच्या आरोपावरून बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली जून महिन्यात अटक केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)