कोपरगाव शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

file photo

कोपरगाव – पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्‍यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सोबतच जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. वीजपुरवठा खंडित झाल्याने ऐण दीपोत्सवात नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.

ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर निसर्गाने पावसाच्या रुपाने सर्वांना सुखद धक्का दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. दिवाळीनिमित्त फुललेल्या बाजारपेठेत रस्त्यावरील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्ते पावसाच्या पाण्याने चकाचक झाले. थंडीच्या काळात पावसाअभावी उकाडा वाढला होता. पण अचानक आलेल्या पावसाने थंडावा निर्माण झाला.

दिवाळीचा सण साजरा नाही झाला, तरी चालेल पण पाऊस झाला पाहिजे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. असा पाऊस आणखी दोन-चारवेळा पडला, तरच कोपरगाव तालुक्‍याला दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे शहरातील वीजपुरवठा अनेक तास खंडीत झाल्याने शहर अंधारात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)