जिल्ह्यात 28 लाख 48 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

कोपरगाव – जिल्ह्यातील चौदा सहकारी व सात खाजगी अशा एकवीस साखर कारखान्यांनी आतापर्यंत 28 लाख 48 हजार 46 मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यापासून 27 लाख 67 हजार 84 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. दैनंदिन साखर उतारा 10.07 टक्‍के आहे.

राज्यात 86 सहकारी आणि 68 खाजगी अशा 154 साखर कारखान्यांनी 1 कोटी 60 लाख 46 हजार मे.टन उसाचे गाळप करून त्यापासून 1 कोटी 55 लाख 44 हजार क्विंटल साखरेचे उपादन केले आहे. राज्याचा दैनंदिन साखर उतारा 9.70 टक्‍के आहे. अंबालिका साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप केले आहे.

-Ads-

गाळप मे.टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे :

अंबालिका 3 लाख 80 हजार 645, पोते 3 लाख 98 हजार 350, (11.35 उतारा).प्रसाद शुगर 37 हजार 320, 29 हजार 709 (7.96). साईकृपा 76 हजार 113, 69 हजार 900, (9.50). क्रांती शुगर पारनेर 48 हजार 958, 50 हजार 175, (9.00). गंगामाई 2 लाख 28 हजार 590, 2 लाख 10 हजार 950, (10.57). शिवाजीराव नागवडे 1 लाख 80 हजार 265, 1 लाख 86 हजार 75 (11.33). अगस्ती 1 लाख 37 हजार 238, 1 लाख 38 हजार 480, (10.84). सहकार महर्षी थोरात 2 लाख 59 हजार 770, 2 लाख 58 हजार 320 (11.60). अशोकनगर 89 हजार 720, 83 हजार 400 (10.65). पदमश्री विखे 1 लाख 66 हजार 550, 1 लाख 52 हजार 600 (10.15). ज्ञानेश्वर 2 लाख 38 हजार 657, 2 लाख 35 हजार 400 (11.00).

कर्मवीर काळे 1 लाख 40 हजार 96, 1 लाख 32 हजार 200 (10.21). सहकार महर्षी कोल्हे 1 लाख 41 हजार 220, 1 लाख 29 हजार 450 (9.91). वृध्देश्वर 88 हजार 470, 69 हजार 750 (10.15). गणेश 23 हजार 450, 1 हजार 7 हजार 775 (8.70). मुळा 2 लाख 26 हजार 270, 2 लाख 15 हजार 600, (10.70). तनपुरे राहुरी 54 हजार 451, 49 हजार 700 (10.25). कुकडी 1 लाख 76 हजार 400, 1 लाख 88 हजार 850 (11.34). जय श्रीराम 43 हजार 23, 29 हजार 709, (7.96). युटेक 64 हजार 890, 59 हजार 450, (9.16). व केदारेश्वर 45 हजार 950, 38 हजार 200 (8.31) याप्रमाणे गाळप आहे.

सध्या ऊस तोडणी मजुरांच्या पालावर गोवर रूबेला लसीकरण जोरात सुरू आहे. ज्या ऊस तोडणी कामगारांकडे लहान बाळ आहे त्यांच्यासाठी डोस देण्याचे काम सुरू असुन त्यांना ऊस तोडणीला खाडा मिळत आहे. थंडीचा कडाका दोन दिवसांपासून वाढला आहे. ज्या साखर कारखान्यांनी ऊस गाळप क्षमता वाढविली त्यांच्यापुढे उस मिळविण्यांचे आव्हान आहे.

संगमनेर साखर कारखान्याने 2 हजार 500 पहिली उचल जाहीर करून अन्य कारखान्यांसमोर आव्हान उभे केले आहे. जिल्हा सहकारी बॅंकेत नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखानदार प्रतिनिधी व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता ऊस दर प्रश्नांबाबत चर्चा होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)