वाळूचोर टोळीविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र 

संग्रहित छायाचित्र

नगर – पोलिस रेकॉर्डवरील आणि वाळूचोरी करणारी कोपरगावातील अट्टल गुन्हेगारांची 13 जणांची टोळीविरुद्ध नाशिकच्या विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस दलाने या टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव ठेवला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्याला मंजुरी दिली.

या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमातील तरतुदींनुसार वाढील कलम लावण्यात आले होते. यानंतर या टोळीविरुद्ध आता मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

-Ads-

अक्षय बारसे (रा. वारी), गणेश हजारे (रा. तीनचारी), जालिंदर कारभारी खंडीझोड ऊर्फ जयदेव (रा. वेस), योगेश भडारी (रा. वारी), देवानंद जयदेव ऊर्फ जालिंदर खंडिझोड ऊर्फ देवा (रा. वेस), सागर भीमराव धोत्रे, अजय महिरे, रवी मोरे (सर्व रा. वारी) व किरण हजारे (रा. तीनचारी, सर्व ता. कोपरगाव), सुरज ठाकुर व प्रतीक गोंदकर (रा. शिर्डी, ता. राहाता), प्रदीप जायभाये, अनंत जायभाये, (रा. आडगाव, नाशिक) या 13 जणांविरुद्ध मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)