कोपरगावात क्रीडा, कला महोत्सवाचे आयोजन – विवेक कोल्हे

कोपरगाव – येथील केबीपी विद्यालय, तहसील कार्यालय, तालुका क्रीडा संकुल, सद्‌गुरू गंगागिर महाराज महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 4 ते 7 डिसेंबरदरम्यान गंगागिर महाविद्यालयाच्या मैदानावर होत असल्याची माहिती कोपरगाव तालुका औद्योगीक वसाहतीचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली.

स्पर्धेचे उद्‌घाटन 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. महोत्सवात दोन गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सीएम चषक अंतर्गत क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, कॅरम, खो-खो, व्हॉलीबॉल, शंभर-चारशे मीटर धावणे, कला-नृत्य-गायन, रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हे म्हणाले, स्पर्धांचे उद्‌घाटन आमदार स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे विश्‍वस्थ बिपीन कोल्हे व राज्यस्तरीय आजी-माजी ज्येष्ठ क्रीडापटूंच्या हस्ते होत आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रथमच भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुका क्रीडा संकुल प्रशिक्षक, आत्मा मालिक क्रीडा शिक्षक, पंच व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर त्यासाठी सहकार्य देत आहेत. विजेत्यांना 51 हजार, 21 हजार, 11 हजार, 15 हजार प्रथम, 31 हजार, 11 हजार, 7 हजार द्वितीय, 15 हजार, 7 हजार व 5 हजार तृतीय असे रोख बक्षिसांसह चषक व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.

क्रिकेट स्पर्धा केबीपी विद्यालय, सगम महाविद्यालय, उडान 100-400 मीटर धावणे स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, कौशल्य भारत कॅरम (10 ते 11 डिसेंबर) कलश मंगल कार्यालय-तालुका क्रीडा संकुल येथे होईल. सौभाग्य खो-खो (10 ते 11 डिसेंबर) क्रीडा संकुलात, स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा (12 ते 13 डिसेंबर) तहसील मैदान, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल स्पर्धा (14 ते 15 डिसेंबर) तालुका क्रीडा संकुल, शेतकरी सन्मान कब्बडी स्पर्धा (14 ते 15 डिसेंबर) तालुका क्रीडा संकुल, उज्ज्वला नृत्य-उजाला गायन, इंद्रधनुष्य चित्रकला, मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा (23 व 24 डिसेंबर) कलश मंगल कार्यालयात होतील.अधिक माहितीसाठी कोपरगाव तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष वैभव आढाव, राजेंद्र पाटणकर व संबंधित क्रीडा शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)