कोपरगांव मतदारसंघाला 500 विहिरींचे वाढीव उद्दिष्ट – आ. कोल्हे

 कोपरगाव : तालुक्‍यासाठी मग्रारोहयो योजनेतून विहिरींचे उद्दिष्ट वाढवून देण्याचे निवेदन मंत्री जयकुमार रावल यांना देताना आ. स्नेहलता कोल्हे व शेतकरी.

कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघाला मग्रारोहयो अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन उद्दिष्ट योजनेतून 500 विहिरींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी रोजगारहमीमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे हिवाळी अधिवेशन काळात केली. त्यांनी त्यास तत्वतः मंजुरी दिली असल्याचेही आ. कोल्हे यांनी सांगितले.

मतदारसंघातील पश्‍चिममेतील जिरायती भागातील रांजणगाव देशमुख, पोहेगाव परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी मग्रारोहयो अंतर्गत विहीर मिळावी, यासाठी पंचायत समितीकडे 217 प्रकरणे दाखल केलेली आहेत. मात्र त्याचे उद्दिष्ट कमी असल्याने त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. जिरायती भागातील शेतकरी या योजनेच्या वंचित राहतात. त्यासाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंत्री रावल यांची हिवाळी अधिवेशन काळात भेट घेऊन शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह निवेदन दिले.

यावेळी ना. रावल यांनी याबाबत माहिती घेऊन हे उद्दिष्ट 500 विहिरीपर्यंत वाढवून देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागास तसे आदेश केले आहेत. शिष्टमंडळात विक्रम पाचोरे, कोपरगाव बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, कोपरगाव तालुका देखरेख संघाचे रामदास राहणे, माजी सरपं कैलास राहणे, रांजणगाव देशमुखचे सरपंच संदीप रणधीर, विलास डांगे, रावसाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, नानासाहेब वर्पे, बाळासाहेब थोरात अदींसह शेतकरी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)