पुणे – अकराव्या मजल्यावरील सदनिकेला आग

कोंढवा खुर्द येथील घटना : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

कोंढवा – साळुंखे विहार रस्त्यावरील मेस्ट्रोस सोसायटीतील 11 व्या मजल्यावरील बंद सदनिकेला शॉर्टसर्किटने आग लागली. आग एवढी भीषण होती की, घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सोसायटीची अग्निशमन यंत्रणा बंद असल्यामुळे जवानांना अथक प्रयत्न करावे लागले.

-Ads-

कोंढवा खुर्द येथील साळुंखे विहार रस्त्याच्या शेवटी असणाऱ्या मेस्ट्रोस सोसायटीतील 11 मजल्यावरील फरीदा वाच्छा (व्यवसाय) यांच्या जी 1102 ही सदनिका बंद आहे. या बंद सदनिकेला दुपारी शॉर्टसर्किटने लागली. सोसायटीत सुमारे 200 सदनिका असल्याचे समजते. सदनिकेतून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसताच त्यांनी सोसायटीतील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. तातडीने अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी या सदनिकेमधून 4 सिलेंडर बाहेर काढले. यातील तीन सिलेंडर भरलेले होते. हे सिलेंडर फुटले असते तर, संपूर्ण सोसायटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या धाडसामुळे हा अनर्थ टळला. वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आग आटोक्‍यात आणण्यासाठी 3 फायर गाड्या व ऑक्‍सिजनचे 8 सिलेंडर वापरण्यात आले. स्टेशन ऑफिसर प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा अग्निशमन दलाचे राहुल बांदल, तेजस खरविले, अनिमिष कोंडगेकर, दत्तात्रय वाघ, योगेश जगताप, चंद्रकांत गावडे, संजय जाधव, सुभाष नरके, शैलेश गोरे आदी जवानांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)