रनिल विक्रमसिंघे यांच्या समर्थकांची कोलोंबोत प्रचंड रॅली 

कोलोंबो – श्रीलंकेच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलेले रनिल विक्रमसिंघे यांच्या समर्थनार्थ आज राजधानी कोलोंबोमध्ये प्रचंड रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र जनसामान्यांच्या भावना भडकावणारी ही रॅली म्हणजे बंड असल्याचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या संसदेमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी आता दोन्ही बाजूच्या आघाड्यांवर वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

“सिरीसेना यांनी वचनभंग केला असून प्रशासकीय अधिकार आपल्या हातात घेतले आहेत. त्यांनी संसदेच्या अधिकारांनाही डावलले आहे.’ असे विक्रमसिंघे यांनी या रॅलीला संबोधित करताना म्हटले आहे. “युनायटेड नॅशनल पार्टी’ आणि “युनायटेड नॅशनल फ्रंट’मधील अन्य राजकीय पक्ष आपला संघर्ष सोडणार नाहीत. संसदेमध्ये लोकशाही मार्गाने आवाज उठवला जाईल, असेही विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. आजच्या भव्य रॅलीमध्ये 1 लाख समर्थक जमा झाल्याचा दावा “युएनपी’ने केला आहे. तर पोलिसांच्या मते रॅलीसाठी 25 हजार नागरिक जमा झाले होते. यामध्ये बौद्ध भिक्षुंचाही समावेश लक्षणीय होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)