आगीमुळे कोलकाता मेट्रोत धावपळ

कोलकाता -पश्‍चिम बंगालच्या कोलकाता मेट्रो सेवेतील एका रेल्वेला गुरूवारी आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे मेट्रोच्या डब्यात धूर भरला गेल्याने 12 हून अधिक प्रवाशांची प्रकृती बिघडली. या प्रवाशांना मेट्रोतून बाहेर काढण्यात आले आहे.

शहराच्या रविंद्र सदन आणि मैदान या स्थानकांदरम्यान मेट्रो ट्रेनला आग लागली होती. आग लागताच मेट्रोच्या कर्मचाऱ्य़ांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. यानंतर डब्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्चिम बंगाल अग्निशमन दल आणि कोलकाता पोलीस आपत्ती व्यवस्थापनाचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आहेत. कोलकाता मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्य़ाने दुर्घटनेची पुष्टी दिली आहे. आग लागल्यानंतर 30 मिनिटांपर्यंत डब्यात अडकून पडलो होतो, असे संतप्त प्रवाशांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)