कोलकातामधील रुग्णालयात भीषण आग 

250 रुग्णांना सुरक्षीत बाहेर काढण्यात यश 
कोलकाता: पश्‍चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयामधून सुमारे 250 रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही.
रुग्णालयाच्या फार्मसी विभागात ही आग लागली. आगीच्या ज्वाळा इतक्‍या भीषण होत्या की रुग्णालयात एकच धावपळ उडाली होती. तर त्या ठिकाणी अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केला होता. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. सध्या अग्निशन दलाकडून आग शमवण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.
स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेले सर्व रुग्ण सुरक्षित असून, आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तत्परता दाखवत सुमारे 250 रुग्णांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)