कोल्हापूर सैन्य भरती : देशभरातून हजारो तरुण कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर – कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्याला तब्बल पंधरा हजारांहून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली आहे. आज मैदानी चाचणीचा अखेरचा दिवस आहे.

कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री बटालियनतर्फे नियोजन केलेल्या भरती मेळाव्यात प्रादेशिक सैन्य भरतीसाठी २ मार्चपर्यंत कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी अशी भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून भरती मेळाव्यास प्रारंभ झाला. आजही प्रथम धावणे, उंची आणि कागदपत्रांची तपासणी केली. मोठ्या प्रमाणात भरतीसाठी उमेदवार आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावला होता.

दुसरया दिवशी महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक येथील उमेदवारांनी हजेरी लावली. कोल्हापुरातील प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी निवड चाचणी मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आदी राज्यांतील तरुण आले आहेत.

उमेदवारांना उन्हाचा तडका….

हे युवक तळपत्या उन्हामध्ये या निवड चाचणीला सामोरे जात आहेत. त्यामुळं उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने बीड च्या युवराज बाळासाहेब हिंगोले आणि निपाणीच्या सनी संतोष ज्वारे हे सैन्यभरतीसाठी आले असता दुपारी भरती प्रक्रियेदरम्यान त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. पोलिसांनी त्यांना तत्काळ सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले. आज मैदानी चाचणीचा अखेरचा दिवस आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/411921099560608/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)