कोल्हार खुर्दच्या अंगणवाडीत आढळला सात फुटी साप 

कोल्हार खुर्द – सकाळी 9 वाजताची वेळ, कोल्हार खुर्द (ता. राहुरी) येथे अंगणवाडीत शिकणारे भोसलेनगर, भाऊसाहेबनगर, खंडोबानगर परिसरातील सगळे चिमुकले वर्गात आले होते. कुणी खेळतो, कुणी शिकतोय, तर कुणी गाणी गातोय, सगळे चिमुकले आणि अंगणवाडीसेविकांसह मदतनीस कामात व्यस्त असतानाच उंदीर पकडण्याचा प्रयत्न करणार साप वर्गात दिसला अन्‌ एकच धांदल उडाली.

कोल्हार खुर्द येथील भोसलेनगर भागातील अंगणवाडीत सकाळी नियमितपणे अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि शाळेत येणारे परिसरातील सगळे चिमुकले आले होते. अंगणवाडीसेविका बाळगोपाळांना गप्पा, गोष्टी, गाणी आणि खेळ शिकविण्यात व्यस्त होत्या. सर्व चिमुकल्यांचे लक्ष शिक्षिकेकडे असताना अचानक मागच्या बाजूने एक साप उंदीर पकडण्याचा प्रयत्न करत पत्र्याच्या पाइपमधून अंगणवाडीच्या वर्गात घुसला.

साप वर्गात घुसल्याचे लक्षात आल्यानंतर एकच धांदल उडाली. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. ग्रामस्थांसह महिलांनी आपल्या चिमुकल्यांच्या काळजीपोटी तेथे गर्दी केली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याना काहीच सुचत नव्हते. दरम्यान कोणी तरी प्रवरा परिसरात प्रसिद्ध असलेले सर्पमित्र अमोल शिरसाठ यांना संपर्क केला. ते आले व त्यांनी तो साप पकडला. तो सर्प धामण जातीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)