माणुसकीच्या भिंतीवर दातृत्वाचा वर्षाव कोल्हापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद 

दीड लाखाहून अधिक कपड्यांचे हस्तांतरण

कोल्हापूर – आमदार सतेज पाटील व मित्र परिवार यांच्या संकल्पेतून सीपीआर चौकात गेली दोन दिवस उभी असलेली माणुसकीची भिंतीची शनिवारी सांगता झाली. दातृत्ववान कोल्हापूरकारांनी उत्स्फूर्तपणे कपडे दान करीत भिंतीवर दातृत्वाचे थर चढविले. सुमारे दीड लाखाहून अधिक वापरण्यायोग्य जुने कपडे जमा झाले तितकेच कपडे गरजूंना वाटप करण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भिंतीला भेट देवून कपडे दान केले. या दोन दिवसांत कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे साड्या, ब्लॅंकेट, शर्ट, पॅन्ट, टि शर्ट, लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करुन भिंतीवर आणून दिले. गरजू, आर्थिकदृष्ट्‌या तळात असलेल्या तिमीरांची दिवाळी यानिमित्ताने साजरी व्हावी याउद्देशाने उभारण्यात आलेली माणूसकीची भिंत कोल्हापुरकरांच्या दातृत्वाने सफल झाली. इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. 5 हजार नवीन कपडे जमा झाले. गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल संयोजकांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)