कोल्हापूर : वाघवे शाळेचे छत कोसळले; शाळा सुटल्यानंतर घटना घडल्यानं मोठी दुर्घटना टळली

कोल्हापूर : जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. ज्या खोलीचे छत कोसळलं आहे त्या वर्गात पहिलीची मुलं बसत होती. सुदैवाने शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्यानं मोठी दुर्घटना टळलीये.

घटना घडल्यानंतर संतप्त पालकांनी मुले शाळेत पाठवणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. १९५२ साली बांधलेल्या या शाळेच्या इमारतीकडे गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पालकांनी या खोलीच्या दुरावस्थेबाबत प्रशासनाला निवेदनही दिले होते. पण झोपलेल्या प्रशासनाला मात्र याची जाग आलेली नाहीये.

सकाळची शाळा असल्यानं मुलं आज लवकर घरी गेली होती, अन्यथा आज याठिकाणी मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.

एकीकडे मुंबई सारख्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तात्काळ संबंधितांचे निलंबन करण्याचे आदेश देण्यात आले. मग आता वाघवे सारख्या छोट्या गावांमध्ये सुद्धा जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)