ऑल इंडिया रॅंकिंग टेनिस टूर्नामेंट : श्रेया देशपांडेची चमकदार कामगिरी

कोल्हापूर – ऑल इंडिया रॅंकिंग टेनिस टूर्नामेंट मॅचेसच्या माध्यमातून 11 वर्षीय श्रेया देशपांडे हिने औरंगाबाद, नागपूर, रायपूर (छत्तीसगड) आणि पाचगणी याठिकाणी झालेल्या टेनिस स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.

ऑक्‍टोबर 2018 मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या टॅलेंट स्पर्धेमध्ये श्रेयाने 14 वर्षाखालील गटात विजेतेपद पटकावले याच महिन्यात नागपूर मध्ये झालेल्या चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये 12 वर्षाखालील वयोगटात ती उपविजेती ठरली होती. तर, नोव्हेंबरमध्ये रायपुर (छत्तीसगड) येथे झालेल्या टॅलेंट सिरीज स्पर्धेमध्ये 12 वर्षांखालील वयोगटात श्रेयाने विजेतेपद पटकावले व ती उपविजेती ठरली होती.

-Ads-

14 वर्षाखालील वयोगटात झालेल्या दुहेरी स्पर्धेत तिने उपविजेतेपद पटकावले होते. पाचगणी येथे झालेल्या दुहेरी सिरीज स्पर्धेमध्ये ती विजेती ठरली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)