अंबाबाईच्या गाभार्‍यातील दर्शन आज बंद 

कोल्हापूर / प्रतिनिधी: शारदीय नवरात्रौत्सवाची वेगाने तयारी सुरू असल्याने आज मंदिरातील गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत गाभार्‍यातील दर्शन बंद राहणार आहे. या कालावधीत उत्सव मूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले. श्री अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी महाकाली, महासरस्वती आदी परिसरातील स्वच्छतेचे काम पूर्ण करण्यात आले. याखेरीज मातृलिंग, शिखरांची स्वच्छता, रंगरंगोटीचे काल दिवसभर काम सुरू होते. दर्शन मार्गावर मंडप उभारणीचे कामही आजपासून सुरू करण्यात आले आहे.
बुधवारी पितळी उंबरठा परिसरात स्वच्छतेचे काम करण्यात आल्यामुळे दुपारपासून पितळी उंबर्‍या बाहेरूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. गुरुवारी गाभार्‍याची स्वच्छता केली जाणार आहे. यामुळे देवीची आरती लवकर होण्याची शक्यता आहे. आरती झाल्यानंतर गाभारा बंद केला जाणार असून, उत्सव मूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता मूर्तीला अभिषेक घालून ती दर्शनासाठी पुन्हा खुली करण्यात येणार आहे. दरम्यान, गुरुवारी देवीच्या चांदीच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जुना राजवाडा परिसरातील महापालिका कर्मचार्‍यांनी स्वच्छता केली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)