कोल्हापूर ही वीरभूमी, तर माजी सैनिक म्हणजे प्रेरणास्त्रोत : बिपिन रावत 

कोल्हापूर – कोल्हापूर ही वीरभूमी असून या परिसरात असलेले माजी सैनिक हे लष्कराचे आणि देशाचे प्रेरणास्त्रोत आहेत, असे गौरवोद्गार भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज येथे काढले. येथील 109 इॅन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा लाईट इन्फन्ट्री यांनी आज माजी सैनिक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी उपस्थित पाच हजार माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांच्यासमोर ते बोलत होते.

यावेळी “कर्नल ऑफ दि मराठा’ लेफ्टनंट जनरल पीजेएस पन्नू, श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रादेशिक सेनेच्या दक्षिण कमांडचे कमांडर ब्रिगेडिअर संजीव तिवारी, 109 प्रादेशिक सेना बटालियनचे स्टेशन कमांडर आर. एस. बहल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जनरल रावत म्हणले की, मराठा पलटणीचा इतिहास रोमांचकारी आणि अभिमानास्पद आहे. भारतीय लष्करात मराठा पलटणीला अत्यंत मानाचे आणि आदराचे स्थान आहे. कोल्हापूर आणि परिसरातील हजारो जणांनी लष्करामध्ये अतुलनीय सेवा बजावून कोल्हापूरचे नाव उज्वल केले आहे. ज्यांनी आपले तारुण्य देशाच्या संरक्षणासाठी लढण्यात खर्च केले, अशा माजी सैनिकांना वंदन करण्यासाठी मी येथे आलो आहे.

लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली, त्यावेळी माजी सैनिकांचे कल्याण हा माझा प्राधान्यक्रमातील विषय म्हणून मी निवडला आहे. आजी- माजी सैनिकांनी नव्या पिढीमध्ये व युवकांमध्ये देशाभिमान जागृत करुन त्यांना मोठ्या प्रमाणात सैन्यात दाखल होण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

लष्करात सेवा बजावताना अपंगत्व आलेल्या दिव्यांग माजी सैनिकांना जनरल रावत यांच्या हस्ते दिव्यांगासाठी असलेल्या स्वयंचलित दुचाकींचे वाटप करण्यात आले. श्रीमती मधुलिका रावत यांच्याहस्ते वीस वीरमाता व वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी हे गाव देशासाठी आदर्शवत आहे. या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही आर्मी मध्ये आहे. त्यामुळं या गावाचा देशसेवेत मोठा वाटा असल्याने गावकऱ्यांचे कौतुक रावत यांनी केले.

नक्षली हल्ले रोखण्यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स 

छत्तीसगड इथे झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलिसनसह एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. आता नक्षली हे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करत आहेत. नक्षली फट्रेड झाल्याने कॅमेरामन वर हल्ला केला असून या नक्षलीना रोखण्यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्‍मीर परिसरात होणारे दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी हे प्रत्येक वेळी हल्ल्याची पद्धत बदलत आहेत. सध्या दहशतवादी हे स्नायफर रायफल वापरात असल्याचा आम्हाला संशय आहे. तर आपल्याकडे एके 47 पद्धतीच्या रायफल असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)