कोल्हापूरच्या जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूर – येथील जिल्ह्यातल्या गिरगावचा जवान सुरज साताप्पा मस्कर याचा डिंजान आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती कळविण्यात आली. अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ पसरली आहे. सोमवारी सुरज चे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.

सैनिकी परंपरा असलेल्या गिरगाव मधील सैन्यात सेवा बजावत असताना मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आहे. मस्कर कुटुंबाची तिसरी पिढी सैन्य सेवेत आहे. सुरज चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. यानंतर आंबोली येथे 12 वी पर्यतचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवघ्या 18 वय वर्षी तो सैन्यात भरती झाला होता.

दोन वर्षापूर्वी त्याचा गावातीलच रेवती जाधव यांच्याशी विवाह झाला होता. सध्या तो 110 बॉम्बे इंजिनियरिंग बटालियन मध्ये कार्यरत होता.आसाम मधील डिंजाल येथे सेवा बजावत होता. एक महिन्याच्या सुट्टी नंतर तो 10 मार्च ला पुन्हा रुजू झाला होता.आज पहाटे तो सहकाऱ्यांसह सेवा बजावत होता. यावेळी त्याला हृदय विकाराचा झटका येऊन तो कोसळला.

सहकार्यनी त्याला दवाखान्यात दाखल केले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. सकाळी सातच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच मस्कर कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत असून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी त्याचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.त्याच्या अंत्यसंस्काराच्या तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)