कोल्हापूर: प्रसिद्ध नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन यांची आत्महत्या

कोल्हापूर/प्रतिनिधी:  कोल्हापूरचे प्रसिद्ध नाट्यवितरक गौरीशंकर ऊर्फ प्रफुल्ल गणपतराव महाजन यांनी शाहु मिल परिसरातील कोटीतीर्थ तलावात आत्महत्या केल्याच आज उघडीस आले. ते रविवारी पहाटे पासून बेपत्ता होते. त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या होत्या. अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांचा शोध घेतला असता सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

प्रफुल्ल महाजन हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह होते. यापूर्वी ते संचालक आणि नियामक मंडळाचे सदस्य होते. नाट्यचळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा पुढाकार होता. ते नेहमी सकाळी फिरायला जात होते. गेल्या दोन-तीन महिन्यापासून ते फिरायला जात नव्हते. रविवारी पहाटे ते कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवसभर ते घरी न आल्याने कुटूंबियांनी शोध घेतला असता त्यांच्या चपला कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आढळून आल्या. त्यानंतर अग्निशामक आणि आपत्ती विभागातील जवानांनी त्यांची शोधाशोध केली अखेर सोमवारी त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांनी अशाप्रकारे जिवन संपविण्याचे कारण काय होते, याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.

महाजन बेपत्ता असले बाबत त्यांच्या कुठुमबीयांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोधही घेत होते. परंतु आज त्यांचा मृतदेह सापडल्या नंतर नेमकी त्यांनी आत्महत्या का केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)